संभाजी महाराजांना पकडल्यानंतर 40 दिवस दिवसापर्यंत का वाट पहिली मराठा फौजांनी मुघलांनवर आक्रमण का केले नाही
जॉन शॉ एका भयानक दृश्याचे वर्णन करताना म्हणतो, "Dire scene of horror which no pen can trace nor rolloging years form memories of ages efface." म्हणजेच 'दृश्य असे भीषण की कोणतीही लेखणी ते आपल्या सामर्थ्याने टिपू शकणार नाही. स्मृतीची पाने तर कितीही वर्षे संपली तरी पुसली जाणार नाहीत." असंच काहीसं संभाजी महाराजांना पकडल्यानंतरच्या ४० दिवसांचे वर्णन आहे. धर्मासाठी बलिदान करणारे संभाजी राजे एक अभिषिक्त धर्मवीर राजे बनले!
आता मूळ मुद्यावर येतो.
संभाजी महाराजांना पकडल्यानंतर 40 दिवस त्यांचे हाल करण्यात आले या दरम्यान मराठा फौजांनी मुघलांनवर आक्रमण करून महाराजांना का सोडले नाही?
संभाजी महाराज आणि कवी कलश यांना शेख निजाम मुकर्रबखानाने ३ फेब्रुवारी १६८९ रोजी संगमेश्वर येथे पकडले आणि त्याच दिवशी लगेच तो पूर्ण बंदोबस्तात दोघांना घेऊन बहादूरगडास जाण्यास निघाला. दुर्दैवाने तो कोणत्या मार्गाने गेला हे आज कळत नाही.
संभाजी महाराजांना सोडवून आणण्यासाठी मराठ्यांकडून काही प्रतिकार झाला का?
दुर्दैवाने याबद्दलही ठोस पुरावे सापडत नाहीत. परंतु समकालीन साधनांमधून आपण तर्क लावू शकतो.
= शेख निजामाने संभाजी राजांना ३ तारखेस कैद केले आणि तो ४ तारखेला रात्रीपर्यन्त आंबाघाट किंवा तिवरा घाट चढून कराड जवळ किंवा इस्लामपूर नजीक आला. इकडे आल्यावर कदाचित दीक्षितांच्या आणि देसाईंच्या सैन्याने त्याच्यावर आक्रमण केले असावे.
कारण,
दीक्षित आणि देसाई घराणी त्याच भागातील आहेत. (आजही त्यांचे वंशज तिकडे आहेत.) आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांना इनामदारी मिळाली होती. इनामदारीचे कोणते कागद उपलब्ध नाहीत, परंतु नक्कीच काहीतरी मोठ्या कामगिरी बद्दल मिळाली असेल. त्यामुळे आपण असा तर्क लावू शकतो की दीक्षित आणि देसाईंनी संभाजी महाराजांना सोडविण्याचे प्रयत्न केले असावेत.
परंतु दुसरीकडे समकालीन साकी मुस्तैकखान म्हणतो,
"…विजयी मुकर्रबखान हा या मुलखातून(युक्तियुक्तीने) बाहेर पडला. आलमगीर बादशहाच्या भाग्याने, त्या काफराच्या सहाय्यकांपैकी आणि पाठीराख्यांपैकी कोणीही त्याच्यासाठी काहीही धडपड करू शकले नाहीत."
मुकर्रबखान काही साधासुधा सेनापती नव्हता. त्याचे नियोजन हे त्याच्या कुशल सेनापतीपदास गौरव प्राप्त करून देणारे ठरले यात काही शंका नाही. त्याने सगळा प्रवास फार जलद गतीने केलेला दिसतो. संगमेश्वर ते बहादूरगड हे अंतर साधारण ३२५ किलोमीटरचे आहे जे घाटांमुळे ३६० किलोमीटर होते. मुकर्रबखानाने हा प्रवास १३ दिवसात पूर्ण केला. म्हणजे प्रति दिवशी साधारण ३० किलोमीटर्स.
याच सगळ्यामुळे मराठ्यांनी काही प्रयत्न केले होते की नाही हे ठामपणे आपण सांगू शकत नाही.
धन्यवाद ।
Comments
Post a Comment